Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांसाठी तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी होत आहे सज्ज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चिमूर, चंद्रपूर गडचिरोली, भामरागड,अहेरी, भंडारा,देवरी,नागपूर व वर्धा या नऊ प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कबड्डी खो-खो व्हॉलीबॉल व हँडबॉल या सांघिक तथा थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, धावणे व चालणे या वैयक्तिक क्रीडा स्पर्धांसोबत शैक्षणिक गुणवत्तेच्या विविध स्पर्धांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित क्रीडा स्पर्धेत जवळपास 3000 खेळाडू विद्यार्थी सहभागी होत असून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास 400 कर्मचारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी विभागाने सोपविली आहे. आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ब्रह्मपुरी परिसरातील क्रीडाप्रेमींना एक पर्वणी उपलब्ध होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये