Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

डोलारा तलाव परिसरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             शहरातील डोलारा तलाव परिसरात असलेल्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे या कत्तलखान्याला कायमस्वरूपी बंद करून हिंदू धर्मियांना न्याय द्यावा,यासाठी भद्रावती येथील विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलातर्फे येथील तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. हिंदू धर्मात गाईला पूजनीय स्थान आहे.मात्र शहरातील कत्तलखान्यात मोठ्या संख्येने गोवंशाची कत्तल करण्यात येत आहे. याबाबत अनेकदा तोंडी तक्रारी करण्यात आल्या,मात्र तक्रारीनंतर काही दिवस कत्तलखाना बंद ठेवून तो परत सुरू करण्यात येतो.

त्यामुळे कारवाई करून हा कत्तलखाना त्वरित कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला असून निवेदन देतांना हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पवन हुरकट, शिवम दातारकर, सुरज पेंदाम, विशाल दाते, प्रवीण गिरोले, क्षितिज कामटकर, गोपाल पार्धे, मंगेश पढाल, मयूर सातपुते, मयूर सोनटक्के, अर्जुन लांजेकर, वेदांत भटारकर, कुणाल पारदे, विक्रांत बिसेन, निहाल बांदुरकर, अनुज आगलावे, विशाल निंबाळकर, सुरेश मुरस्कर, नितीन तेजने, राज हुरकट, मंगेश नामोजवार वेदांत भटारकर, रवी नंदनवार तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये