Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संत झिंगुजी महाराज मठा समोर, जुना बस स्टॉप येथे नुकतेच पार पडले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे अध्यक्ष अँड. भुपेंद्र रायपुरे , उद्घाटक चंद्रपूर जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक तथा उद्योग उपसंचालक ऋतुराज सूर्य, मुख्य अतिथी बँक ऑफ बडोदा चे शाखा व्यवस्थापक अतुल ठावरी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापक मंदा खंगार, गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे शाखा व्यवस्थापक अनिरुद्ध पाथ्ररडकर आणि चार्टर्ड अकाउंटंट मोईज बोहरा प्रामुख्याने उपस्थित होते.

     याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक तथा उद्योग उपसंचालक ऋतुराज सूर्य यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत स्वयंरोजगार उभारणीसाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. स्वयंरोजगार उभारणीत को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे महत्वपूर्ण योगदान आहे. येत्या काळात समाजातील अधिकाधीक युवक – युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऋतुराज सूर्य यांनी केले. कार्यक्रमात संचालक मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत सायरे, मानद सचिव नरेंद्र कन्नाके, संचालक महेंद्र रायपूरे, डॉ. प्रकाश तितरे, दिनेश कातकर, संजय बोधे, संदिप वालदे, संदिप जिवने, अँड. दिव्या वाघमारे, नवका घडले व तज्ञ संचालक आनंदराव वानखेडे, अँड. मिलिंद रायपुरे, यांच्यासह भद्रावती, वरोरा व चंद्रपूर विभाग संचालक समितीचे सर्व सदस्य वृन्द उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित मुख्य अतीथींनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे मानद सचिव नरेंद्र कन्नाके, सुत्रसंचलन उपाध्यक्ष यशवंत सायरे व आभार प्रदर्शन संचालक महेंद्र रायपूरे यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेखा व्यवस्थापक महादेव कोल्हे यांनी विषद केली.

[सर्वसामान्य जनतेला आर्थीक बळ देण्याचा अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा प्रयत्न : अँड. भुपेंद्र रायपूरे 

 प्रत्येक सर्वसामान्य कुटूंबाची आर्थीक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती झाली पाहीजे. यासाठी कुटूंबाला स्वावलंबी बनविण्यासाठी स्वयंरोजगार हा महत्वपूर्ण पर्याय आहे. स्वयंरोजगारातून आर्थीक प्रगती साधता येईल.

आर्थीक प्रगतीतून शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक सर्वसामान्य कुटूंबातील गरजवतांना स्वयंरोजगार उभारणीसाठी आवश्यक असणारा पत पुरवठा अग्रक्रमाने पूरवून सर्वसामान्य जनतेला आर्थीक बळ देण्याचा अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अवर अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अँड. भुपेंद्र रायपूरे यांनी केले. ]

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये