ताज्या घडामोडी

अनिल मत्ते यांचा खून : मातीच्या ढिगाऱ्यात सापडला मृतदेह

डोझर मशीनद्वारे माती काढल्यानंतर सापडला मृतदेह

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील चालबर्डी रोडवर आज सकाळी बुलडोझर मशिनमधून माती काढली जात असताना एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाला.
माजरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालबर्डी येथील ६५ वर्षीय फिर्यादी विठ्ठल लक्ष्मण मत्ते यांनी माजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे की १७ जून रोजी रात्री ८ वाजता त्यांचा मुलगा अनिल मत्ते हा कोंढा गावात गेला होता. पण तो आला नाही. गावातील त्याच्या मित्रांना विचारले असता, विजय रामदास मत्ते यांचे त्या रात्री चालबर्डी रोड बसस्थानकाजवळ शेत असून त्यांनी ही माती रस्त्यावर टाकली होती, त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणावरून अनिल मत्ते व विजय रामदास मत्ते यांच्यात मारामारी होऊन विजय रामदास मत्ते यांनी अनिल मत्ते यांना मारहाण केली. निशांत झाडे, अमोल बाबा उपरे, बंडू डाहुले, करण खपणे यांच्या समोर मारपीट झाली होती. त्यांची मोटारसायकल एमएच-३४-एडी-२४७४ ही डाव्या बाजूला उभी होती. चालबर्डीचे सरपंच विजय खंगार यांनी विजय मत्ते यांना तातडीने मातीचा ढिगारा हटवण्यास सांगितले. १७ जून रोजी रात्री ९.३० वाजता विजय मत्ते यांनी एम्टा खानीतुन डोझर बोलावला व त्या डोझर चा चालक मंगेश रामचंद्र उपरे यांनी शेतातील भद्रावतीच्या बाजूची माती मशीनच्या साह्याने साफ केली.
मृत अनिल मत्ते याच्या संशयावरून मृत्युची माजरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तेथील मातीत सापडला. मृत्यु चे कारण अद्याप कळू शकलेली नाही. अनिल मत्ते याला मुद्दाम मातीत दाबुन मारले की चुकीमुळे रात्रीच्या अंधारात मातीचे ढिगारे साफ करत असताना त्यात दबुन त्याचा मृत्यू झाला हे अजुन कळले नाही. चालबर्डी, माजरी कोंढा या परिसरात हत्येची चर्चा आहे.
माजरी पोलिसांनी आरोपी विजय रामदास मत्ते चालबर्डी व डोझर चालक मंगेश रामचंद्र उपरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरोरा एसडीपीओ आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी ठानेदार अजितसिंह देवरे तपास करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये