ताज्या घडामोडी

नगरपरिषदेने 106 मुलींना बनविले संरक्षणाच्या दृष्टीने आत्मनिर्भर

अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणारी भद्रावती नगर परिषद ही एकमेव नगरपरिषद

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
मुलींवर होत असलेल्या अत्याचाराची वाढती संख्या लक्षात घेता नगरपरिषद भद्रावतीच्या महिला बालकल्याण व डे. एन. यु. एल. एम. अंतर्गत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त कल्पनेने मुलींना स्वतःच्या आत्मसंरक्षणाकरिता तायकांदो प्रशिक्षण दिनांक 17 मे 2023 ते 16 जून 2023 या कालावधीत नगर परिषदेच्या हुतात्मा स्मारक येथे राबविण्यात आली.
सदर प्रशिक्षण कुमारी विद्या किन्नाके, जिल्हा नियंत्रक स्वयंसिद्धा व त्यांची संपूर्ण टीम द्वारे करण्यात आले. तायकांदो प्रशिक्षणाचा हेतू मुलींनी स्वतःच्या संरक्षणाकरिता दुसऱ्यांवर विसंबून न राहता स्वयंभू बनावे याकरिता हे प्रशिक्षण नगरपरिषदेतर्फे विनामूल्य आयोजित करण्यात आले असून अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणारी भद्रावती नगर परिषद ही एकमेव नगरपरिषद आहे. या प्रशिक्षणाकरिता सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात 106 प्रशिक्षणार्थी मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केली.
तायकांदो प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी तसेच सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होती. वरील कालावधी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी उपस्थितांसमोर आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना तायकांदो प्रशिक्षणात भाग घेतल्या बाबत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी ज्योती लालसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी पूजा पारखी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये