ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

अंजलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार

यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा २०२३ नीट चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कोरपना येथील अंजली जयवंत वानखडे हिने ७२० पैकी ६१२ गुण संपादन केले. त्यामुळे तिचा डॉक्टर होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आपण शिकून पुढे डॉक्टर व्हावे अशी अंजली ची अगदी बालपणापासूनच जिद्द होती. तिने त्या स्वप्नाला बळ देत कठोर परिश्रम व मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली. या परीक्षेत घवघवीत यश सुद्धा संपादन केले. अंजली चे वडील जयवंत वानखडे हे स्व. संगीताताई चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सद्या ते शिवशक्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष म्हणून संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे.त्यांच्या व शिक्षकाच्या मार्गदर्शक प्रेरणेने तिने हे यश संपादन केल्याचे सांगितले. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये