Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साधला थेट लेखकाशी संवाद

लेखक आपल्या भेटीला उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

  सावली तालुक्यातील विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वर्ग दहावीच्या मराठी विषयाच्या उपक्रमांतर्गत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम घेण्यात आला.

वर्ग दहावीच्या मराठी पाठ्यक्रमातील *निर्णय या पाठाचे लेखक डॉ.सुनील विभुते* यांच्याशी थेट ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद अनमोल आणि आनंददायी ठरला.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना गराटे यांनी शब्दसुमनाने लेखक डॉ. सुनील विभुते यांचे स्वागत केले. भाषा शिक्षक डॉ.धर्मा गावंडे यांनी विज्ञान कथा निर्णय पाठा संदर्भात संवाद साधला. वर्गातील विद्यार्थ्यांनी लेखकांना अनेक प्रश्न विचारले‌. पाठावर आधारित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.त्यामध्ये साहिल लाकडे, दुशांत कडस्कर,कलश कडस्कर, तन्मय मोहुर्ले,कुंदन ठाकूर, हिमांशू उंदिरवाडे,साहिल उंदिरवाडे,साईनाथ धारणे, कु.अदिती वाकडे, कु.तनुज्या सहारे,ख़ुशी पोरेडीवार, सत्यवान गेडाम , प्रीतम भंडारे आणि साहिल घरत

इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्साहाने संवाद साधला.सर्व विद्यार्थ्यांनी नम्रपणे सरांना नमस्कार केला. लेखक डॉ. सुनील विभुते यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा संदर्भात आणि येत्या १०वी बोर्डाच्या परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. लेखकांनी अभ्यासक्रमा संदर्भात समाधान व्यक्त केलं.

या संदर्भात लेखकांनी प्राचार्याशी संवाद साधत असताना इमारत, ग्रंथालय मोठी असल्याने शाळा मोठी होत नाही तर प्राचार्य आणि शिक्षक उपक्रमशील असेल तर ती विद्यार्थ्यांसाठी शाळा खूप मोठी असते. अशा प्रकारची शाबासकीची थाप लेखक डॉ. सुनील विभूते यांनी दिली.लेखकांनी आपल्या शालेय जीवनातील जुने दिवस आठवले आणि चंद्रपूर जिल्ह्याशी असलेले नाते उल्लेखनीय आहे हेही यावेळी नमूद केले. लेखकांचे आभार शालेय उपमुख्यमंत्री साहिल लाकडे या विद्यार्थ्यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये