Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्रीगुरुदेव सुसंस्कार एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

वर्ग ६ ते वर्ग १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावतीच्या वतीने दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोज रविवारला श्री मुरलीधर पाटील गुंडावार लाॅन, भद्रावती येथे एक दिवसीय सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन वर्ग ६ ते वर्ग १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच या कार्यशाळेत सहभागी होता येईल.

सकाळी ६.३० वाजता पासुन या कार्यशाळेला सुरुवात होऊन उपासना संस्कार, योग संस्कार, ध्यान संस्कार, साहित्य लेखन संस्कार, आरोग्य संस्कार, स्पर्श संस्कार, अभिनय संस्कार, चित्रकला संस्कार, सुसंवाद संस्कार आदी विषयांतर्गत विविध तज्ञ मंडळीद्वारे विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.

सध्याची विस्कळीत दिनचर्या, दुषीत खानपान व त्यामुळे होणारे आजार, मोबाईलचा सैर वापर, भडक -अश्लिल-हीनदृश्याचे प्रसारण, व्यक्तिमत्व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे असह्य शिक्षण व त्यातून जडणारे मानसिक रोग, ताणतणाव आदीचा सुळसुळाट झाला आहे.

अशा परिस्थितीत सुसंस्कारयुक्त सदगुणांनी सहज शिक्षणातुन बाल तरुणांची मने घडुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रवेश घेण्याकरीता दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोज शनिवारला दुपारी २.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत श्री मुरलीपाटील गुंडावार लाॅन येथे विद्यार्थ्यांच्या शालेय ओळखपत्राची झेराॅक्ससह प्रत्यक्षात येऊन नोंदणी करावी लागेल. बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सुध्दा या कार्यशाळेत सहभागी होता येत असुन त्यांना प्रत्यक्षात मोबाईल वरुन त्यांची नोंदणी करता येईल.

अधिक माहितीसाठी गुणवंत कुत्तरमारे, गजानन डंभारे, विशाल गावंडे, विवेक महाकाळकर, नितीन खैरकार, क्षितीज शिवरकर यांच्याशी कार्यशाळेबद्दल संपर्क करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये