Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीच्या लक्ष्मीनगरमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था

नागरिकांनी केली त्वरित उपाययोजनेची नगर पालिकेला मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        भद्रावती येथील विंजासन रोडवरील लक्ष्मीनगर वसाहत, पांडव वार्डमध्ये २०१३-२०१४ पासून नागरी वसाहत अस्तित्वात आली आहे. मात्र, येथील रस्त्यांचे अद्याप खडीकरण किंवा डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे येथील १७ कुटुंबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

  पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनते. चिखल आणि पाण्याने रस्ते जलमय होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. नागरिकांनी वारंवार नगरपरिषद भद्रावतीकडे डांबरीकरण आणि ओपन स्पेस विकसित करण्याची मागणी येथील रहीवाशी नागरिक सुनील पोटदुखे, प्रवीण गिरोले, कृष्णमुरारी तिवारी, नितीन चेंदे, रवींद्र राम, अनिल घडले, संजय मासळकर, केशव बोंडे, वैभव सोनुकले, कु. चेतना भगत यांनी नगर परिषदे भद्रावतीला २४ मे २०२३ रोजी निवेदन सादर केले व समस्या मांडल्या गेले होते.

मात्र, १ वर्ष होऊनही या समस्यांवर अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी नगरपरिषदेकडून त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये