ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुलैपर्यंत मुदत तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, पीकविमा नोंदणी पूर्ण करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ साठी लागू करण्यात आली. त्यासाठी कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत पीकविमा नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात खरीप – हंगाम २०१६ पासून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना कप अॅन्ड कॅप मॉडलनुसार राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२६ व रब्बी हंगाम २०२६

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे.

डिजीटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.

प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्र मर्यादा राहील.

२७ करिता योजनेची अंमलबजावणी पुणे येथील इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तरी कोरपना तालुक्यातील जास्तीत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे.

भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील योजनेत सहभागी होऊ शकतात.

भाडेकरार पीकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांचा विमा हप्ता खरीप पिकांसाठी २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के, नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित.

बोगस, फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यास कृषि विभागाच्या डीबीटी आधारित योजनांचा लाभ पाच वर्षांसाठी बंद करण्यात येईल.

जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये