ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुका देखरेख खरेदी-विक्री संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

आमदार करण देवतळे यांची प्रमुख उपस्थिती; शेतकरी व नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती तालुका देखरेख खरेदी-विक्री संस्थेच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ८ जुलै रोजी उत्साहात पार पडला. यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे प्रमुख उपस्थित होते.

नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार करण देवतळे तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी सांगितले की, हे नवे कार्यालय शेतकरी, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक असून संस्थेच्या कार्याला या नव्या कार्यालयामुळे निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती राजू डोंगे, भद्रावती तालुका देखरेख खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष दादाजी भट, उपाध्यक्ष ॲड. निलेश पिंगे, संचालक मंडळाचे सदस्य, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये