सावंगी मेघे पोलिसंकडून गांजा अमली पदार्थ बाळगून विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई
सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 10/07/2026 रोजी पो.स्टे. सावंगी मेघे येथील पथक अवैध चंदयावर कारवाई संबंधाने पोस्टे. परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की नौजा सुकळीबाई येथे राहणारा ईसम आपले राहते घरी अवैधरीत्या गांजा नावाचा अमली पदार्थ बाळगून गांजाची चोरटी विकी करीत असतो. अशा माहितीवरून सदर ठिकाणी पंच, पो स्टाफ व मापारीचे सह जावून रेड केला असता आरोपी नामे नथ्थुजी लक्ष्मण दाते वय 84 वर्ष सुकळीबाई ता. सेलू जि. वर्धा याचे घरडाडंती मधून (1) निव्वळ गांजा वजन 922 ग्रेम कि 18.440/रू. 2) गांजा विकीचे नगदी 2.250/रू. असा एकूण ज, कि. 20,690 रू. चा सरदेमाल मौक्का जप्ती पंचनामा कारबाई प्रमाणे जप्त करून आरोपी विरूब्द पोस्टे. ला अपक 5/2026 कलम 8(क), 20(ब) (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, याचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा. वाणेदार पो.स्टे. सावगी पोलीस स्टाफ पोउपनि, गोपाल शिंदे, पो.उप.नि. मनोज टिपले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सजय पचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैदय, कॉन्स्टेबल निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जायद यानी केली पुढील तपास पो.उप.नि. मनोज टिपले, हे करीत आहे



