ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 2,47,400/- रूपयाचा दारूचा मुद्देमाल केला जप्त

पोलीस स्टेशन सावंगी मेघेयेथील दारूबंदी विभागाची उत्कृष्ट केलेली कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो स्टे सावंगी मेघे येथील दारूबंदी विभागाचे पोलीस हवालदार अभय खोब्रागडे व त्यांचे पथक पो. स्टे. परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन आरोपी नामे 1) अक्षय सिद्धार्थ वैद्य वय 22 वर्ष रा. थुल लेआऊट सिंधी मेघे, वर्धा ता.जी. वर्धा आरोपी क्र 2) सागर ज्ञानेश्वर जयस्वाल वय 29 वर्ष रा. गोंडप्लॉट, वर्धा ता.जी. वर्धा हे दोन्ही आरोपी हे आपले ताब्यातील मोटारसायकलने गावठी मोहा दारूचा व विदेशी दारुचा माल घेवुन दारुची अवैध्यरित्या वाहतुक करणार आहे अशा प्राप्त खबरेवरुन दोन्ही नमुद आरोपीवर पंच व पो स्टॉफचे मदतीने पिपरी मेघे ते ऊमरी मेघे रोडवर श्याम मोहोड यांचे ढाब्यासमोर नाकेबंदी करुन प्रो रेड केला असता नमुद आरोपी क्रमांक 01 चे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती पांढ-या रंगाचे सुझुकी बर्गमॅन दुचाकी क्र MH-32-AZ-5965 ची किंमत 120000/- रू 2) दोन प्लास्टीक पन्नीत विदेशी दारुने भरलेल्या ओ, सी कंपनीच्या 180 एम.एल च्या एकुण 90 निपा प्रती निप 300/-रु प्रमाणे 27000/-रु माल 3) एका कागदी खोक्यात विदेशी दारुने भरलेल्या ओ, सी ब्लु कंपनीच्या 180 एम.एल च्या एकुण 45 निपा प्रती निप 400/-रु प्रमाणे 18000/-रु माल असा एकुण जु.की 165000/- रू चा मुद्देमाल आरोपी क्रमांक 02 चे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती काळ्या रंगाचे बजाज डीस्कवर दुचाकी क्र MH-32-S-2511 ची किंमत 60000/- रू 2) 04 प्लॉस्टीकचे डबकीत प्रती डबकी अंदाजे 28 लीटर प्रमाणे एकुण 112 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 22400/- रू चा माल असा एकुण जु. की 82400/- रू चा मुद्देमाल असा दोन्ही आरोपीचे ताब्यातुन एकुण 247400/-रु.चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद दोन्ही आरोपी 1) अक्षय सिद्धार्थ वैद्य वय 22 वर्ष रा. धुल लेआऊट सिंधी मेघे, वर्धा ता.जी. वर्धा आरोपी क्र 2) सागर ज्ञानेश्वर जयस्वाल वय 29 वर्ष रा. गोंडप्लॉट, वर्धा ता.जी. वर्धा यांचे विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. सुनील महाडीक यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक विनोद गिरी, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब. नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये