हेलोडी बोरगाव येथे २२ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
नातेवाईकांचा हत्येचा आरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू तालुक्यातील हेलोडी बोरगाव येथे २२ वर्षीय मनिषा विनोद मोहिते हिचा राहत्या घरात मृत्देह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. नातेवाईवकांनी आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप केला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सेलू तालुक्यातील हेलोडी बोरगाव येथे २२ वर्षीय विवाहिता मनिषा विनोद मोहिते हिचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली असून गावात शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर मनिषा हिला प्रामीण रुग्णालय, सेलू येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
मृत मनिषा हिचे माहेर अमरावती जिल्ह्यात असून, घटनेची माहिती मिळताच तिचे आई-वडील व नातेवाईक सेलू पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ही आत्महत्या नसून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सासू, सासरे व दीर यांच्यावर संज्य व्यक्त केला आहे.
मनिषा हिचे पती BSF मध्ये कार्यरत असून, घटना घडली तेव्हा ते कर्तव्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.
घटना कशी घडली ?
प्राथमिक माहितीनुसार दुपारी सुमारे ३ वाजता मनिषा हिला घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पुढील तपास पोलिस करत आहेत.
मृत : मनिषा विनोद मोहिते (वय २२)
या प्रकरणाचा तपास सेलू पोलिसांकडून सुरु असून, चौकशीसाठी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल व पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
नातेवाईकांचा आरोप
ही आत्महत्या नसून मनिषा हिची गळा दाबून हत्या करण्यात आली असून सासू, सासरे व दीर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पतीची माहिती मनिषा हिचे पती सध्या BSF मध्ये कर्तव्यावर असून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली.
हेलोडी बोरगाव येथे २२ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
नातेवाईकांचा हत्येचा गंभीर आरोप मृत मनिषा हिचे माहेर अमरावती जिल्ह्यात पती BSF मध्ये सेवेत, घटना घडली तेव्हा कर्तव्यावर सासू, सासरे व दीर यांच्यावर आरोप पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा पोलीस करीत असून कार्यवाही सेलु पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे. पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.



