ताज्या घडामोडी

25 वर्षीय युवकाकडून दोन तलवारी जप्त – राजुरा शहराची गुन्हेगारीकडे झपाट्याने वाटचाल?

स्थानिक गुन्हे शाखेने केली धडक कारवाई

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

एरव्ही शांततेसाठी प्रसिध्द असलेल्या राजुरा शहराची गुन्हेगारीकडे झपाट्याने वाटचाल सुरू असुन शहरात एकामागून एक अवैध शस्त्रास्त्र जप्ती तसेच गुन्हेगारी कारवाया उघडकीस येत असल्याने नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. प्राप्त माहितनुसार शहरातील गांधी भवन वार्ड, राजुरा येथील अहफाज अली नुरुद्दीन ह्या 25 वर्षीय युवकाकडून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने म्यानासह दोन तलवारी जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी ह्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जेरबंद करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. प्राप्त निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांनी जिल्ह्यात सर्वत्र आपले मुखबिर सतर्क केले होते. ह्या मुखबिरमार्फत स्थानिक गुन्हे शाखेला राजुरा येथिल गांधी भवन वार्ड, मधे वास्तव्यास असलेल्या अहफाज अली नुरुद्दीन हा युवक अवैधरीत्या तलवार सदृश्य प्राणघातक धारदार शस्त्र बाळगत असल्याची माहितi मिळाली.

प्राप्त माहितीनुसार महेश कोंडावार ह्यांनी पो.उप नि अतुल कावळे याचे पथक तयार करुन, दि. 14/12/2023 रोजी आरोपी सय्यद अहफाज अली सय्यद नुरुद्दीन, ह्याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन दोन लोखंडी तलवारी किं 4,000/- रू व दोन म्यान किं. 200/-रू. असा एकुण 4,200/- रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध पोस्टे राजुरा येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोस्टे राजुरा करित आहे.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, पो हवा, मिलींद चव्हाण, अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्में, गणेश मोहुर्ले ह्यांनी यशस्वीरीत्या पार पडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये