ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. गजानन राऊत यांच्या ‘इसादास भडके : व्यक्ती आणि वाड्मय’ ग्रंथाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आंबेडकर साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विदर्भ महाविद्यालय,जिवती येथील मराठी विभागप्रमुख डॉ गजानन राऊत यांच्या ‘ इसादास भडके: व्यक्ती आणि वाड्मय ‘ या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. गजानन राऊत यांनी हा ग्रंथ चिकित्सक संशोधनातून परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. भडके यांनी आपल्या लेखनातुन समाजातील वंचित घटकांचे प्रश्न, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि मानवी मूल्यांची जपणूक यांना प्राधान्य दिले इसादास भडके हे साहित्यिक नव्हते तर सामाजिक विचारवंत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे.

तसेच त्यांच्या वाड्मयीन योगदानाचा सखोल अभ्यास या ग्रंथात डॉ. राऊत यांनी केला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. निमसरकार तर उद्घाटक डॉ. वामन गवई ,कवी लोकनाथ यशवंत, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, श्री. देशक खोब्रागडे, डॉ. इसादास भडके, सौ. भडके, मार्गदर्शक डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. गजानन राऊत इत्यादी मान्यवरांनी ग्रंथाचे प्रकाशन करुन डॉ राऊत यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून साहित्यप्रेमी व वाचक नक्कीच भरभरून या ग्रंथाला प्रतिसाद देतील असा आशावाद व्यक्त केला.

     या कार्यक्रमाचे संचालन शुध्दोधन मेश्राम तर आभार नागेश सुखदेवेनी मानले. यानंतर अनिरुद्ध वनकरांच्या ‘घायाळ पाखरा’ नाटकाचा प्रयोग पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये