ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुद्धभुमी येथे समता सैनिक दलाचे शिबीर उत्साहात संपन्न

३५ नवीन सैनिकांचे प्रशिक्षण; प्रख्यात विचारवंत प्रा.आनंद तेलतुंबडे यांचे सखोल मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) तालुका कोरपना व जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभुमीवर समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर (दि.२१) रोजी आनंददायी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यात एकूण ३५ नविन सैनिकांनी सहभाग घेत प्रशिक्षण पूर्ण केले. जुन्या सैनिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई प्रख्यात विचारवंत प्राआनंद तेलतुंबडे यांनी समता सैनिक दलाचा इतिहास, उद्दिष्टे, सध्याच्या सामाजिक परिस्थितीत त्याची गरज व सैनिकांची जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले.

    शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान कोरपना तालुक्याचे उपाध्यक्ष (संरक्षण विभाग) बादल चांदेकर यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आनंद तेलतुंबडे, प्राचार्य डॉ.सोमाजी गोंडाणे उपस्थित होते. प्रशिक्षणाची जबाबदारी ले.कर्नल प्रफुल भगत, ले.कर्नल गुरूबालक मेश्राम यांनी यशस्वीरित्या पार पाडली तर डिव्हिजन ऑफिसर साक्षीताई नळे यांनी सहाय्यक म्हणून महत्वपूर्ण योगदान दिले.

    तर भा.बौ.म.कोरपना तालुकाध्यक्ष श्रावण जिवणे, जिवती तालुकाध्यक्ष दिपक साबने, कोरपना तालुका सरचिटणीस गिरीष पाझारे, कोषाध्यक्ष उत्तम पारेकर, गडचांदूर शहराध्यक्ष पद्माकर खैरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर चुनारकर यांची विशेष उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन राहुल निरंजने, प्रास्ताविक गिरीष पाझारे व आभारप्रदर्शन पद्माकर खैरे यांनी केले. कार्यक्रमानंतर धम्ममित्र अमित थोरात, राठोड सर व त्यांच्या मित्रमंडळींनी दानपारमिता पूर्ण करत सर्वांना मसालाभात व जिलबीचे वाटप केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये