डायल 112 वर पोलीसांना खोटी माहीती देणाऱ्या कोपरा गावातील इसमावर दहेगाव गोसावी पोलीसांनी केला गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 23/09/2025 रोजी सकाळी 11/42 वाजता दरम्यान पो.स्टे. दहेगाव गो. चे 112 चे एम.डि.टि. मशीनवर मोबाईल नं. 9021671789 वरून कॉल आला की, कोपरा गावाचे बसस्टॉफ जवळील परिसरात 4 ते 5 लोक पैशावा जुगार खेळत आहे. अश्या कॉल वरून पोलीस स्टेशन दहेगाव गो. येथील पोलीस अंमलदार तात्काळ कोपरा गावातील बसस्टॉफ जवळ पोहचले असता बसस्टॉफ व आजुबाजुचे परिसराची पाहणी केली असता,
कोणीही जुगार खेळतांणा दिसले नाही. तसेच जुगाराचे साहीत्य सुध्दा दिसुन आले नाही. त्यावरून दहेगाव पोलीसांनी कॉलरचे मोबाईलवर वर कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद दाखवीत होता. गावात माहीती घेवुन नमुद इसमाचे घरी कोपरा गावातील वार्ड नं. 2 येथे जावुन नमुद इसमाचे घरी जावुन विचारपुस केली असता त्याचे नाव विचारले असता हनुमान गजानन धुर्वे वय 28 वर्ष रा. कोपरा (चाणकी) ता. सेलु जि. वर्धा असे सांगीतले. त्यास डायल 112 वर खोटी माहीती का दिली ? असे विचारले असता त्याने मी दारूचे नशेत होतो. त्यामुळे असाच फोन केला होता असे सांगीतले. त्यामुळे नमुद इसमाने दहेगाव पोलीसांना खोटी माहीती देवुन लोकसेवकांची दिशाभुल केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद इसम याचे विरूध्द अदखलपात्र गुन्हा क्र. 0124/2025 कलम 212 भारतिय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दहेगाव गोसावी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. प्रल्हाद मदन यांनी दहेगाव गोसावी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सुजान नागरिकांना आवाहण केले आहे की, डायल 112 (महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीम ) ही सेवा जनतेला योग्य वेळी मदत मिळण्याकरीता शासणाकडुन तयार करण्यात आलेली आहे. त्याचा कोणीही गैरवापर करून पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करू नये. कोणीही खोटी माहीती दिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याबाबत सर्व सुजान नागरिकांनी नोंद घ्यावी.
सदरची कार्यवाही मा. सहा. पोलीस निरिक्षक प्रल्हाद मदन ठाणेदार पो.स्टे दहेगाव गो. यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी आनंद भस्मे, राजेश कंगाले, बम्हानंद मुन, अनिल चिलगर, रूस्तम मुंगल होमगार्ड सैनिक राहुल मडावी व मनिष थुल यांनी केलेली आहे.