ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र परिचय मेळावा संपन्न 

अनुलोम मित्र परिवारचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली २०१६ पासून अनुगामी लोकराज्य अभियान (अनुलोम) अंतर्गत शासकीय योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी काम करीत आहेत.समाजातील तळागाळातील लोकांच्या आर्थिक विकास व्हायचा असेल तर त्यांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अनुलोम मित्रांना व्हावी या दृष्टीने जिवती पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकारी परिचय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात कृषी विभाग,आरोग्य विभाग,पोलिस विभाग,मनरेगा विभाग,शिक्षण विभाग,पंचायत विभाग, पेसा विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून विविध योजनांचे स्वरूप,त्यासाठी लागणारी कागदपत्र,लाभार्थी पात्रतेचे निकष याविषयी माहिती दिली.सर्व पंचायत समिती विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचे विभाग अंतर्गत येत असलेल्या सर्व योजणांचे स्वरूप उपस्थित अनुलोम मित्रांना करून दिले.यावेळी लाभार्थी पात्रतेचे निकष सुध्दा संबंधित अधिकाऱ्यांनी अवगत करून दिले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुनील दालवणकर उपविभाग जनसेवक चंद्रपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील कळसकर सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी जिवती,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल टेंभे,वैभव मोहितकर तालुका कृषी अधिकारी, सतिश मुसळे अनुलोम भाग जनसेवक राजुरा,पोलिस उपनिरिक्षक जगताप,अमर साठे गट शिक्षणाधिकारी जिवती,मुनेश खोब्रागडे विस्तार अधिकारी सांख्यिकी, सचिन ढोंगळे पेसा समन्वयक,निकेश चांदेकर MRGS अधिकारी,उमेद अभियान तालुका व्यवस्थापक राजेश दुधे,अंबुजा फाऊंडेशन चे रमाकांत जंगापल्ले, सामाजिक कार्यकर्ते भरत बिरादार उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक सतीश मुसळे भाग सेवक,सूत्र संचालन प्रशांत मोरे केले आभार तानाजी कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुलोम मित्र दत्ता नंदेवार,नरसिंह पोडगिर,तिरूपती केजगिर, पांडुरंग होडबे, सदाशिव ठोंबरे,सचिन मामिडवार यांचे सह तालुक्यातील २७ गावातुन आलेले अनुलोम मित्र उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये