ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे येथील सौंदर्यवती मी महाराष्ट्राची राज्यस्तरीय स्पर्धेत दीपिका अमोल पाठक प्रथम विजेती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रॉयल फाउंडेशन पुणे यांनी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत अंतिम फेरीत महाराष्ट्रातील 42 पदकांची निवड करण्यात आली यामध्ये देळगाव राजा श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरी मधील सौ दीपिका अमोल पाठक ही प्रथम विजेती ठरली .तिला पुणे येथे सन्मानित करण्यात आले .शहरात समाजाच्या सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे

    देऊळगाव राजा श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाठक यांच्या धर्मपत्नी सौ दीपिका अमोल पाठक ही पाठक परिवाराची सून आहे तर याच नगरीमधील भैय्ये परिवाराची कन्या आहे.

.आपले कौटुंबिक दैनंदिन कार्यामध्ये व्यस्त असणारी ही गृहिणी आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवत होती .अशातच पुणे येथील रॉयल फाउंडेशनचे संस्थापक नितीन झग्रे यांनी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच येथे सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले या स्पर्धेसाठी सौदीपिका पाठक यांनी आपल्या नावाची नोंदणी केली .प्रथम फेरीमध्ये छत्रपती संभाजी नगर येथे तिची निवड झाली .महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेत असंख्य महिलास्पर्धकांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेमध्ये परीक्षकांनी अंतिम 42 पथकांची नावे जाहीर केली यामध्ये सौ दीपिका चा नंबर जाहीर झाला आमची स्पर्धा मध्ये पुणे मुंबई नागपूर अशा महानगरातील सौंदर्यवती होत्या यामध्ये कसा टिकाव लागेल असा प्रश्न दीपिका समोर होता स्पर्धेतील विविध फेरीमध्ये ती विजेती होत गेली अंतिम तोंडी प्रश्न उत्तर च्या फेरीमध्ये दीपिका ने परीक्षकांच्या प्रश्नाचे सटीक उत्तर दिले आणि परीक्षकांचा निकाल जाहीर झाला यामध्ये सौ दीपिका अमोल पाठक ही अंतिम ४२ स्पर्धकांमध्ये प्रथम विजेती ठरली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

   सौ दीपिका पाठक हिला सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, स्लॅश, क्राऊन, व्हाउचर आदी देऊनरॉयल फाउंडेशन चे संस्थापक नितीन झगडे अभिनेत्री प्राप्ति खेडकर सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई परीक्षक अतुल गुंजल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या स्पर्धेत दुतीय क्रमांक गौरी भोसले पुणे व तृतीय क्रमांक संजना कुंभार सोलापूर हिने पटकविला.

यावेळेस गतविजेत्या सौंदर्यवती यांचीही उपस्थिती होती. सौ दीपिका पाठक यांनी देळगावराजा बालाजी नगरीच्या नाव महाराष्ट्रात लौकिक केल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये