Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ऑफलाइन सातबाऱ्यानेही होणार कापुस विक्री

आमदार देवराव भोंगळे यांनी लक्ष वेधताच; शासनाचे सीसीआयला निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील वनजमीन व जमीन नोंद तफावतीच्या प्रलंबित प्रश्नामुळे येथील शेतकऱ्यांचा सातबारा उतारा हा संगणकीकृत (ऑनलाईन) झालेला नाही. त्यामुळे जिवती तालुक्यातील शेतकर्‍यांना कोरपना येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) केंद्रावर कापुस विक्री करण्याकरता अडचण निर्माण झाली होती.

शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात येताच; राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राज्याच्या महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांना सदर अडचणीची माहीती देऊन यासंदर्भात तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली.

त्यानुसार, शासनस्तरावरून जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हस्तलिखित सातबाराच्या (ऑफलाइन) आधारे त्यांना कोरपना येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) केंद्रावर कापुस विक्रीची मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबाऱ्याशिवाय ही आपला कापुस विक्री करता येणार आहे.

शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या अडचणीत धावून आल्याबद्दल तालुक्यातील शेतकर्‍यांनी माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये