Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न

शेकडो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

         राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार देऊळगाव राजा तालुका यांच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ.रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते व जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

      देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊळगाव राजा तालुका व श्री गणपती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 301 गरजू नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून मोफत शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन साठी 115 नागरिकांचे ऑपरेशन मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात चष्मे वाटप व तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉ. रामप्रसाद शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, सरस्वती टेकाळे, उद्धवनाना मस्के, शिवानंद शिंदे, सि.राजा तालुका अध्यक्ष राजेंद्र अंभोरे, अरुण मोगल,नारायण कोल्हे, रंगनाथ कोल्हे, गणेश सवडे, गणेश बुरकूल, एल एम शिंगणे,ख. वि. संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, कवीश जिंतूरकर,सौ.मंदाताई शिंगणे, सौ.नंदाताई कटारे, सुरेखा पवार,अलकाताई जायभाये, नवनाथ गोंमधरे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, सचिन कोल्हे,राजू चित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,राजू सिरसाट, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, दीपक मस्के, आदित्य वाघमारे, सुनील नवगिरे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये