Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नेवजाबाई हितकरणी महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- आज दिनांक 1/12/ 2024 ला नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीची रेड रिबन क्लब व एनसीसी युनिट 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन और 20 महाराष्ट्र बटालियन नागपुर। व उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय अधीक्षक डॉ. खंडाळे व प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी इथे एचआयव्ही एड्स विषयक मार्गदर्शन शिबीर व रॅलीचे आयोजनन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्राजक्ता फुलझले यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स होण्याची कारणे, त्याची लक्षणे,उपचार व प्रतिबंध इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी एच एच गहाणे यांनी एड्स वर पूर्णत्वाने मात करण्यासाठी कोणतीही औषध किंवा लस अध्याप उपलब्ध नसल्याने या रोगाला प्रतिबंध करणे हाच एकमेव उपाय आहे हे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन कैप्टन डॉ. कुलजीत कौर गिल यांनी केले तर आभार प्रदर्शन लेफ्टिनेंट अभिजीत परकरवार यांनीकेले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एच गहाणे, कैप्टन डॉ. कुलजित कौर गिल, प्राजक्ता फुलझले, उज्वला मेश्राम, केयरटेकर रवंतदास बोरकर,अभिजीत परकवार, सीनियर अंडर ऑफिसर।चंदा नाकाडे, वीर शेट्टी और एनसीसी कैडेट उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये