Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

26/11 ची शहादत युवावर्गात समर्पित भावना निर्माण करते – कॅप्टन मोहन गुजरकर 

26/11 च्या शाहिदांना एनसीसी छात्र सैनिकांनी केले अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘दहशतवाद, आतंकवाद, हिंसा, युद्धाचे सावट व मोठ्या प्रमाणात असलेला भ्रष्टाचार यासारख्या धोक्यांना पुढे जायचे असेल तर युवा पिढीला सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांना आदर्श नागरिक बनविण्याची नितांत गरज आहे. या दृष्टिकोनातून 26 नोव्हेंबर 2008 ची दहशतवादी हल्ल्याची घटना सातत्याने युवा पिढी पुढे ठेवली गेली पाहिजे. 26/11 ची शहादत युवा वर्गात समर्पित भावना निर्माण करते, असे प्रतिपादन शाहिद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीसी अधिकारी तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर यांनी छात्र सैनिकांसोबत बोलताना 26 नोव्हेंबर रोजी केले.

21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या एनसीसी पथका तर्फे 26/11 शहादत दिन पर्वावर महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मृतीस अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी छात्र सैनिकांनी रायफल सलामी देऊन देशाकरीता शहीद झालेल्या पोलीस व सैन्य दलाच्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी शहीद स्मृतीला पुष्पचक्र प्रदान केले. यावेळी रोव्हर लीडर संतोष तुरक व माजी छात्र सैनिक भाविक आखूड उपस्थित होते.

अंडर ऑफिसर आदर्श नाईक व अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी यांच्या नेतृत्वात रायफल सलामी देण्यात आली. यावेळी सार्जंट खुशी पचारे हीने शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, सार्जंट मनोज नेहारे याने शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे, कॅडेट रसिका बनकर हिने शहीद पोलीस अधिकारी विजय सालस्कर, भाविक आखूड याने तुकाराम ओंबळे तर हरी ओम उईके याने शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोष्टी स्वरूपात शौर्यगाथा सांगितल्या. याप्रसंगी 26/11 दहशतवादी हल्ल्याचा चित्रपट दाखवण्यात आला.

शहादत दिन अभिवादन कार्यक्रमाचे संचालन सार्जेंट कोमल शितळे हिने तर कॅडेट कांचन राऊत हिने आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये