Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

कारसह देशी दारू व विदेशी दारूचा 10 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 26/11/2024 रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हजर असताना अवैद्य धंद्यांवर कारवाई मोहीम राबवून पो. स्टे देवळी हद्दीत नाकेबंदी करून एक गोल्डन रंगाची मारुती कंपनीची MH 01 AH.2148 नंबरच्या कार यवतमाळ मधील कळंब येथून देशी दारू व विदेशी दारू चा माल घेऊन नागपूर तुळजापूर महामार्ग वरून देवळी येथे जाणार आहे.

अशा माहिती वरून त्याच्यावर नागपूर तुळजापूर हायवे मौजा वाई फाटा येथे नाकाबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी नामे 1) जनार्दन नंदूजी बऱ्हाणपुरे वय 32 वर्ष रा. इंदिरा नगर देवळी जि. वर्धा 2) सुनील कुरसुंगे रा. इंदिरा नगर देवळी जि.वर्धा 3) प्रमोद धात्रक रा. इंदिरा नगर देवळी जि. वर्धा 4) महेश जैस्वाल देशी दारू व विदेशी दारू दुकान मालक रा. कळंब जि. यवतमाळ यांच्या ताब्यातून 30 खड्यांच्या खोक्यात देशी दारू गोवा कंपनीच्या 180 ml च्या 1440 सिलबंद शिश्या व 2 खोक्यात ऑफिसर चॉईस कंपनीच्या 72 सिलबंद शिशा एक गोल्डन रंगाची SX4 मारुती कंपनीची MH 01 AH 2148 क्रमांकाची कार असा एकूण 10,13,200/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला, चार आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार पो.हवा शेखर डोंगरे, पो .हवा आशिष महेशगौरी, पो. शि विकास मुंडे, पो.शि सुगम चौधरी, पो. शि शुभम राऊत. सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये