स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही
पाच ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन जेसीबी व रेतीसह एकुण 85 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 26/11/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हिंगणघाट डिव्हिजन परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना वणा नदी पात्रात रेतीघाटातुन दोन जेसीबी व पाच ट्रॅक्टरचे ट्राँलीद्वारे अवैद्यरित्या रेती चोरी व उत्खनन रेती चोरी करून वणा नदी पात्रातून घेऊन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग दरम्यान पोलीस स्टेशन समुद्रपूर हद्दीत वणानदी रेतीघाटत अवैद्यरित्या रेती चोरी व उत्खनन करीत असताना चोरीच्या रीतीने भरलेले पाच ट्रॅक्टर ट्रॉली सह रेती भरून वाहतूक करीत मिळून आले व रेती घाटामध्ये दोन जेसीबी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये मध्ये काळी ओली रेती भरून देताना मिळून आल्याने आरोपी नामे 1) जेसीबी चालक – गजानन छगन तामसवाडे, वय 30 वर्ष, रा. ब्राह्मणी ता. जि. नागपूर 2) जेसीबी चालक – श्रावण रामचंद्र सीडाम, वय 32 वर्ष, रा. हरणखुरी, त. समुद्रपूर जि. वर्धा 3) ट्रॅक्टरचा चालक – यशवंत परसराम दाते, वय 43 वर्षे, रा. कांढळी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 4) ट्रॅक्टर चालक – अरविंद अशोकराव कोटनाके, वय 30 वर्ष, रा. रामनगर, त. समुद्रपूर, जि. वर्धा 5) ट्रॅक्टर चालक – अमोल गोविंदराव डोमकावळे, वय 28 वर्ष रा. कांढळी, त. समुद्रपूर, जि. वर्धा 6) ट्रॅक्टर चालक – आकाश भाऊराव कन्नाके, वय 29 वर्ष, रा. हरणखुरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा
7) ट्रॅक्टर चालक – प्रशांत देवराव चौधरी, वय 30 वर्ष, रा. निरगुडी, त. समुद्रपूर, जि. वर्धा 8) जेसीबी व ट्रॅक्टर मालक – महादेव वांदिले, कांढळी, त. समुद्रपूर, जि. वर्धा (पसार)
9) जेसीबी व ट्रॅक्टर – मालक युवराज कारमोरे, रा. कांढळी त. समुद्रपूर, जि. वर्धा, (पसार)आरोपी त्यांचे ताब्यातील पाच ट्रॅक्टरद्वारे व दोन जेसीबीव्दारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना ओल्या काळ्या रेतीची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता (गौण खनिज) रेती अवैद्यरित्या उत्खनन करून चोरून वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व पाच ब्रास (500फुट) रेतीसह एकुण 85,25,000/-रुपये चा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला. सदर नमुद आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउनि सलाम कुरेशी पोलीस अंमलदार हमीद शेख, नरेंद्र पारीशर, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, रवी प्रोहीत, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, नितीन इटकरे, सागर भोसले, उदय सोळुंके सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.