Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

घरावर दुःखाचा डोंगर पण मतदानाच्या कर्तव्याचा न झाला विसर

रवींद्रकुमार जयस्वाल यांचे निधनाचे दुःख झाकत जयस्वाल कुटुंबाचा आदर्श 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 : उत्कृष्ट बॅडमिंटन पटू तसेच बाजारलाईन मधील झेरॉक्स सेंटरचे संचालक रवींद्र कुमार जयस्वाल यांचे काल, 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही जयस्वाल परिवारातील जवळपास 20 ते 25 सदस्यांनी दिवंगत रवींद्र कुमार जयस्वाल यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी मतदानाचा संस्कार निभावला.

जयस्वाल कुटुंबीयांनी ठेवलेल्या या सामाजिक आदर्शाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिवंगत रवींद्र कुमार यांच्या पार्थिवावर आज 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास इकबाल चौकामागील वैकुंठधाम स्मशानभूमी याठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर अंशुमन, दोन मुली डॉ. मेघा आणि नेहा असा परिवार आहे. घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावणाऱ्या जयस्वाल कुटुंबियांनी मतदान न करता घरीच बसून राहणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये