Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनाचे जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी मागितली आत्महत्या करण्याची परवानगी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची परवानगी मिळण्याबाबत उपवनसंरक्षक, प्रादेशिक, बुलढाणा यांचेकडे 18 नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन कऱण्यात आली आहे.

वनरक्षक एल डी राठोड यांनी आपल्या विरोधात 24 ऑगस्ट रोजी तक्रार केली आहे. त्या तक्रारीची कसलीही शहानिशा न करता आपल्या वर अन्याय केला आहे त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले आहे, श्री राठोड यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हंटले आहे,

मी जिल्हा अध्यक्ष असल्याने अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्या विरोधात खोटे आरोप करत सुड भावनेतून कारवाई करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे, यातुन माझे मानसिक संतुलन बिघडले असून मला आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती निवेदनातून केली आहे,

निवेदनाच्या प्रती विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण, बुलढाणा यांना देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये