ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन

आयोजित सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. यामुळे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकप्रिय नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शनिवारी १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील गांधी चौक येथे होणार आहे.
२०१९ मध्ये देशात सर्वत्र मोदी लाट होती. मात्र, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी ही लाट थोपवली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून विजय प्राप्त करीत संपूर्ण राज्यात इतिहास रचला. काँग्रेस पक्षासह अन्य पक्षातील सर्वच नेत्यांशी त्यांची मैत्री होती. युवक काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या सर्व युवा वर्गांसाठी प्रेरणादायी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. चंद्रपूर जिल्ह्यासाठी आशेचा किरण असलेल्या या लोकप्रिय नेत्याचे अल्पावधीत निधन झाले. बाळूभाऊंच्या निधनाने त्यांच्यावर प्रेम करणारी जिल्ह्यातील जनता पोरकी झाली आहे.
त्यामुळे या लोकप्रिय नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे युवा कार्यकर्ते राहुल चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केले आहे.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये