क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी-विदेशी दारूचा साठा केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 16/06/2023 रोजी कार्यालयीन कामकाज करीत असतांना ना.पो.शि अमर लाखे यांना मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी महीला आरोपी हीचेवर वडर झोपडपटटी, आर्वी नाका, गांधी नगर वर्धा येथे प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी हीचे घरझडतीतुन 1 ) 180 एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या एका अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 24 कॉचेच्या शिश्या प्रति नग 350 /- रू प्रमाणे एकुण 8400 /- रू.2) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या दोन खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 96 कॉचेच्या शिश्या प्रति नग 300 /- रू प्रमाणे एकुण 28,800 /- रू. 3) 500 एम. एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या बियर किंगफिशर स्ट्रोम कंपनिच्या दोन खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 48 टिनाचे कॅन प्रति नग 250 /- रू प्रमाणे एकुण 12,000/-रू. 4) 90 एम.एल. च्या टॅगो कंपनिच्या देशी दारू गोल्डन संत्रा दारूने भरून असलेल्या 1 खर्रडयाचे खोक्यामध्ये एकुण 90 शिश्या प्रति नग 70 /- रू. प्रमाणे एकुण 6300/- रू. असा एकुण जु. कि. 55,500 /- रू चा माल बिनापास परवाना मिळुन आला वरून आरोपी हीला सदर विदेशी – देशी दारूचे कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता आरोपी हीने सांगीतले की हा विदेशी देशी दारूचा माल मला आकाश जयसिंघानिया रा. पोददार बगीचा, वर्धा यांनी आणुन दिला असल्याचे सांगीतल्याने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दोन्ही आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 690/2023 कलम 65 (ई) 77 (अ). 83 म.दा.का नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर, येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री आबुराव सोनवणे सा. याचे सुचनेप्रमाणे, तसेच पो.उप.नि परवेज खॉन, संजय गायकवाड, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे नापोशि. अमर लाखे, पो.शि, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, प्रमोद वाघमारे, राजु वैध, संदीप अलोने यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये