ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत मतदान यंत्र

चंद्रपूर तहसील कार्यालयात मशीन तयार करण्याची प्रक्रिया

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामांची लगबग वाढली असून २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे सुरू असून दोन दिवसांत संपूर्ण मशीन सज्ज करण्यात येणार आहे.

विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात १० आणि ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत घेण्यात येत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ९३६ बॅलेट युनीट, ४६८ कंट्रोल युनीट आणि ५०३ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण ३० टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी याप्रमाणे एकूण ९० कर्मचा-यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात येत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी ५ टक्के म्हणजे १९ मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पध्दतीने निवडण्यात आले. प्रत्येक मशीनवर १००० याप्रमाणे दोन दिवसांत १९ मशीनवर १९ हजार मॉक पोल घेण्यात येणार आहे.

अशी असते प्रक्रिया : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएम चा डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.

यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये, रविंद्र भेलावे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये