ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी मद्य, गावठी दारु व साहित्यासह 1 कोटी 42 लाखाचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई ; पोलीस विभागाची कारवाई 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : विधानसभा निवडणूक 2024 करीता जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने दि.7 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात अवैध दारुनिर्मिती, दारु विक्री, दारु वाहतुकी विरुध्द केलेल्या कारवाईत देशी, विदेशी मद्य, गावठी दारु व साहित्यासह 1 कोटी 42 लक्ष 4 हजार 330 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये 10 लाख 16 हजार 300 रुपयाच्या 5 हजार 105 लिटर गावठी दारु, 60 हजार 30 रुपयाच्या 47.61 लिटर देशी, 1 लाख 29 हजार 100 रुपयाच्या 76.834 लिटर विदेशी मद्य तर 1 कोटी 19 लाख 82 हजार रुपयाच्या 1 लाख 2 हजार 602 लिटर सडवा जप्त करण्यात आला असून याची एकुण किंमत 1 कोटी 31 लाख 87 हजार 430 रुपये इतकी आहे. या कारवाईत आरोपीने दारु वाहतुकीकरीता वापरलेले 2 लाख 40 हजार रुपयाचे 3 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून या कारवाईत 7 लाख 76 हजार 900 रुपयाचे दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. असा एकुण 1 कोटी 42 लाख 330 रुपयाचा दारु व साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व वर्धा जिल्ह्यातील संबंधीत पोलीसस्टेशन अधिकारी व कर्मचा-यांनी केली.

या कारवाईत विविध दारु विक्रेते वाहतुक करणारे व दारु निर्माण करणा-यांवर 138 गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई आतापर्यंत कारवाईत निवडणूकी दरम्यान केलेले मोठी कारवाई आहे, असे पोलीस विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये