खुन करून फरार झालेला आरोपी ताब्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी अशोक शंकर गुळधाने रा. बुरकोणी, हिंगणघाट यांनी दिनांक 06/11/2024 रोजी तक्रार दिली कि, त्यांची आई मृतक चंद्रभागाबाई गुळ्याने हि घरी एकटी हजर असतांना यातील आरोपी नरेंद्र उर्फ गोलू अशोक गुबंधाने याने मृतक हिचे डोक्यावर कोणत्यातरी टनक वस्तुने मारून गंभीर जखमी करून खुन केला त्यावरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप कमांक 1456/2024 कलम 103 (1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वयेचा दाखल असुन तपासावर आहे.
मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन साहेब यांनी सदरचा गुन्हा हा आयत गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी वेगवेगळी 03 पथके तयार करून आरोपीचे शोधकरीता जिल्हा अकोला, अमरावती, नागपुर व हिंगणघाट परीसरात रवाना केले. आरोपी नरेंद्र उर्फ गोलू अशोक गुजघाने हा मोटर सायकलवर फ्सार होवुन नंतर रेल्वेने पसार झाल्याचे माहितीवरून त्याचा शेगाव जि. अकोला, अमरावती, नागपुर रेल्वे स्टेशन, कर्चा रेल्वे स्टेशन, सेवाग्राम रेल्वे स्टेशन परीसरात बारकाईने शोध घेतला तो मिळून आला नाही आरोपी हा वारंवार त्याचा राहण्याचा ठिकाण बदलवीत होता. आरोपी हा बाहेर राज्यात पळून जाण्याकरीता वर्धा रेल्वे स्टेशन परीसरात येत असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्याने वर्धा रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचुन आरोपी नामे नरेंद्र उर्फ गोलू अशोक गुळधाने वय 37 वर्ष रा. बुरकोणी ता हिंगणघाट जि. वर्धा, याला मोठया शिताफिने ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची माहिती दिल्याने त्यास गुन्हयाचे पुढील तपासाकरीता पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हयाचे तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि श्री अमोल लगड, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण निघोट, महादेव सानप धर्मेद्र अकाली पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष काबंळे गोपाल बावणकर, मंगेश आदे,, अमोल नगराळे, दिपक साठे, अक्षय राउत सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.