ताज्या घडामोडी

मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन

एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन व लॉयड्स इंफिनाइट फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर तर्फे यावर्षी देखील कृत्रिम अवयव वितरण प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले असुन सदर प्रकल्प लॉयड्स इंफिनाइट फाउंडेशन घुग्गुसच्या व एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने असोसिएशन कार्यालय, संदीप पेट्रोल पंपाजवळ, घुग्गुस रोड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत, लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशन घुग्गुसच्या सहकार्याने, कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर गराजवंतांना तत्काळ विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे हे विशेष. त्याचप्रमाणे पोलिओग्रस्त रुग्णाचे ऑपरेशन आवश्यक असल्यास, महावीर सेवा सदन, कलकत्ता येथे विनामुल्य शस्त्रक्रिया करण्यात येईल त्याचबरोबर त्या रुग्णाला तातडीने कॅलिपर मोफत दिले जाईल.

मानवसेवेचे हे कार्य यशस्वी करण्यासाठी गरजवंतांचे तसेच समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याने नोंदणीकृत रुग्णांना दिनांक 13 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान त्यांच्या उपस्थितीचीच्या तारीख व वेळेबाबत सुचना देण्यात येणार असुन ह्या कालावधीत इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामात व्यस्त न राहता आम्हाला आपली सेवा करण्याची संधी देण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

शिबिरात नोंदणी करण्यासाठी रुग्णांना आधार कार्ड आणि फोटो पुढील पैकी मोबाईल क्रमांकावर पाठवायचे आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

नोंदणीसाठी संपर्क:

अजय (विपिन) कपूर – 9822202266,  मधुसूदन रुंगटा – 9822739737,  संदीप बंठिया – 9822204524, शेख रहेमान पटेल – 9422839140, प्रदीप बुक्कावार – 9730045465,, सुरेश शर्मा – 9422135590

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये