ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

कचराळा शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          शिवारातील शेतात बैल चरत असताना एका वाघाने हल्ला करून बैलाला ठार केले. सदर घटना तालुक्यातील कचराळा येथील शेतशिवारात दिनांक 29 ला घडली. बैलाचा मृत्यू झाल्याने बैल मालकाचे जवळपास 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कचराळा येथील शेतकरी महादेव येरगुडे यांचा बैल जंगलालगत असलेल्या त्यांच्या शेतात चरत असताना वाघाने त्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. सदर घटनेची तक्रार महादेव येरगुडे यांनी भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात केल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.

एका बैलाचा मृत्यू झाल्यामुळे महादेव येरगुडे यांची शेतीची कामे रखडली आहे. सदर बैलाच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी येरगुडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये