ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरीची संगीतमय दिवाळी पहाट

एन.डी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

दिपावलीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने बुधवार ३० ऑक्टोबर २०२४ ला सकाळी ६ वाजता हॉटेल एन.डी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी परिवारातील सदस्यांनी सरस गीते सादर करून रसिक श्रोत्यांची दिवाळी पहाट संगीतमय केली.

दिवाळीच्या औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर वतीने दिपावलीच्या शुभेच्छाचे आदान प्रदान करण्यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी परिवारातील सदस्यांनी पारंपारिक वेशभूषा करीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सर्वप्रथम रोटरीचे अध्यक्ष अजय पालारपवार, सचिव मिलिंद बोडखे, माजी अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार, पांडुरंग आंबटकर, राम चांदे, अनुप यादव, शफिक अहमद, अरुण तिखे, संदीप रामटेके , प्रोजेक्ट डायरेक्टर मनीष बोराडे, अलका ठाकरे, मनीषा पडगिलवार, वृषाली डेकाटे, स्मिता जीवतोडे यांच्या उपस्थित दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर गणेश वंदनेसह वैदेही तेलंग व काव्या हिने नृत्य सादर केले. अनया अनिशा भारत यांनी दिपावली मनाये सुहानी हे गीत सादर केले. आर्यन भागरिया, रिचा भागरिया हिने हर हर शंभाे हे गीत सादर करून रोमांचित केल, सचिन गांगरेड्डीवार यांनी राधा ही बावरी, डाॅ. अशोक वासलवार यांनी दिल धुडता हे फिर वही हे गीत सादर करून गुलजार यांच्या गीतांची आठवण करून दिली. राजेश गन्नारपवार यांनी तुम भी चलो हम भी चले, किर्ती चांदे यांनी आते जाते हसते गाते, अर्क करवाडे सेत बांधा रे सेतू बांधा, अंकित आंबटकर यांनी राम आयेंग आयेंगे, अर्क करवाडे व मनिषा पडगिलवार यांनी मेरे घर राम आये है हे गीत सादर केले. यावेळी अनुप यादव यांनी रामाची तर नेहा यादव यांनी सीतेची भूमिका सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. आर्यन भागरिया हा हनुमान झाला होता. डॉ. सिमला गजारलावार यांनी अब तो है तुमसे हर खुशी अपनी, डॉ. सरबेरे यांनी चलते चलते ये मेरे गीत याद रखना, वृषाली डेकाटे दिखाई दिये , डॉ. राम भारत, प्रा. विजय बदखल, प्रसाद कुष्णमूर्ती, संजय अग्रवाल, मनीषा पडगिलवार दे रे कान्हा चोळी लुगडी, निर्मिती बदखल यांनी रहे ना रहे हम ही गाणी सादर करीत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष प्रोत्साहन, कन्याका बँक, पांडुरंग आंबटकर अनुप यादव ,उत्तम डाखरे, स्मिता जीवतोडे, राहुल खटोड, सुधीर बजाज ,संजय ढवस, संतोष तेलंग, नवीन चोरडिया, विजय बदखल यांचे लाभले. प्रकल्प निर्देशक मनीष बोराडे, अलका ठाकरे ,मनीषा पडगिलवार ,वृषाली डेकाटे, अनुप यादव ,स्मिता जीवतोडे ,संतोष तेलंग सचिन गांगर्डेवार , अशोक हासानी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये