ताज्या घडामोडी

बल्लारपूर शहरातही आम आदमी पक्षातर्फे महिला मेळावा व विद्यार्थ्यांचा सत्कारासह स्वराज्य संवाद संपन्न

चांदा ब्लास्ट :

दिनांक- 15/06/2023- गुरुवार
दिल्ली-पंजाब मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर व गोवा- गुजरात विधानसभेत प्रवेश करून राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या आम आदमी पक्षाने आता महाराष्ट्राकडे नजर वळवली आहे. नुकतेच झालेल्या पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रनंतर आता पक्षाने ‘स्वराज्य संवाद सभा’ सुरू केला आहे. बल्लारपूर शहरातही जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात ‘स्वराज्य संवाद सभा’ शहरातील पेपर मील काटा गेट चौकात संपन्न झाला आहे. या स्वराज्य संवाद कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा तसेच 10 वी व 12 वी परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखडे, डॉ. केशव बांते, जिल्हा संघटनमंत्री प्रा.नागेश्वर गंडलेवार आणि भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, सुनिता पाटिल, संजना मूलचंदानी, स्नेहा भाटिया, डॉ. सपना इत्यादि मान्यवर उपस्थित होते. या स्वराज्य संवाद कार्यक्रमांत पाहुण्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी जी धडपड आम आदमी पक्ष करत आहे त्याची माहिती जनतेला दिली. कार्यक्रमाला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद पहावयास मिळाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये