ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज उन्नतीचे प्रभावी सूत्र सामुदायिक प्रार्थना – बंडोपंत बोढेकर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथातील २७ आणि २८ ह्या दोन अध्यायातून सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व विषद केले आहे. समाजात सुख शांती निर्माण व्हावी, सर्व घटकांनी एकत्र यावे, आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, युवक उद्योगशील बनावे , एकंदरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित सामुदायिक प्रार्थनेत समाज उन्नतीचे सूत्र असल्याचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी येथे केले.

    अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली शाखेच्या वतीने ५६ व्या पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने सामुदायिक प्रार्थनेच्या प्रसंगी श्री. बोढेकर बोलत होते. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, उपाध्यक्ष अरविंद पाटील वासेकर, सचिव पंडित पुडके, जिल्हा प्रचारक नानाजी वाढई, आजीवन प्रचारक आत्माराम आंबोरकर, पुरूषोत्तम कुळमेथे, घनश्याम जेंगठे, पांडुरंग घोटेकर,मधुकर भोयर, लक्ष्मण अलाम, मारोती उईके, मधुकर नंदनवार, कमलकिशोर खोब्रागडे, कवडू येरमे आदी श्री गुरुदेवकांची उपस्थिती होती.

   श्री. बोढेकर पुढे म्हणाले की, वं. राष्ट्रसंतांच्या मते सामुदायिक प्रार्थना ही मानव्य विकासाची शाळा असून श्रीगुरुदेव ही व्यक्ती नसून ती विश्वाची संचालन करणारी शक्ती आहे. प्रार्थना ही लोक सुधारणचे विद्यालय आहे, करिता ही प्रार्थना गावागावात व्हावी अशी इच्छा राष्ट्रसंताची होती, असे ते म्हणाले.

      सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले. या कार्यक्रमानंतर कढोली येथील ह.भ.प सौ. दिलशाताई ठलाल यांचे कीर्तन झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये