ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी संघटनेच्या वतीने विर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली

विर बाबूराव शेडमाके : आदिवासी स्वाभिमानाचा लढवय्या योद्धा

चांदा ब्लास्ट

       विर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक २१ आक्टोंंबर रोजी कोरपना येथे शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेडमाके यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत, विविध पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. विदर्भातील आदिवासींच्या न्याय-अधिकारांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शेडमाके यांच्या स्मृतींना वंदन करत उपस्थितांनी त्यांच्या विचारसरणीला पुढे नेण्याचा निर्धार केला.

      कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पा. कोरांगे, जिल्हाध्यक्ष अरुण पा. नवले, प्रख्यात नेते विलासराव धांडे, ॲड. दीपक चटप, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बावणे, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, मदन सातपुते, भास्कर मत्ते, रमाकांत मालेकर, अनंता गोडे, प्रभाकर लोडे, रवी गोखरे, उत्तम गेडाम आणि सत्यवान आत्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

   विर बाबूराव शेडमाके हे विदर्भातील आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाने स्वाभिमानी महापुरूष आहेत. त्यांनी ब्रिटीश शासनाच्या दडपशाहीविरुद्ध सशस्त्र संघर्ष करून आदिवासींच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा संघर्ष केवळ राजकीय स्वातंत्र्यापर्यंत मर्यादित नसून, सामाजिक न्यायासाठी लढण्याचे आदर्श उदाहरण होता. शेडमाके यांचे जीवन हे विदर्भ आणि महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, आणि वंचित घटकांसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने शेडमाके यांच्या विचारधारेवर आधारित संघर्षाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात बोलताना प्रमुख नेत्यांनी शेडमाके यांच्या योगदानाचा गौरव करत, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवण्याची गरज अधोरेखित केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये