ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हुतात्मा दिना निमीत्य वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे शहीद जवानांचे स्मृतीस श्रध्दांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. २१ ऑक्टोंबर पोलीस स्मृतीदिन कर्तव्य पथावर अग्रेसर होत असतांना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपुर्ण रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रात्रे यांची पर्वा न करता १० पोलीस जवान प्राणपणाने लढले व मातृभूमीच्या रक्षणार्थ या शुरविरांनी मोठ्या संखेने असणाऱ्या शत्रुशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. तब्बल २४ दिवसानंतर चीन ने या भारतीय पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले, तेव्हा संपुर्ण देश हळहळला होता. वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्याची इतरांना प्रेरणा मिळावी आणि कर्तव्याची व राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीत संपुर्ण देशात २१ ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.

 दि. २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी पोलीस स्मृतीदिना निमीत्य पोलीस मुख्यालय, वर्धा येथे शहीद जवानांना श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०१ सप्टेंबर २०२३ ते दि. ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपुर्ण एकूण २१६ पोलीस अधिकारी व जवान आपले कर्तव्य बजावित असतांना शहीद झाले आहेत. सदर कार्यक्रमात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांचे नावांचे वाचन करुन सर्वप्रथम पोलीस बॅडवर” ये मेरे वतन के लोगो” हे गाने वाजवुन शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन व हवेत रायफलव्दारे ३ फैरी झाडून आणी बिगुलवर लास्ट पोस्ट व रोज रिव्हीली हि ट्यून वाजवून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सदर कार्यक्रमाकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर रतनकुमार कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस दलातील अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच एस.एस.बी. ची कंपनी, सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये