क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

एकूण 8 लाख 56 हजारावर मुद्देमाल जप्त ; आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 15/06/2023 रोजीचे मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. तळेगाव हद्दीत पेट्रोलिंग करित असताना पेट्रोलिंग दरम्यान नाकाबंदी करून अवैधरित्या विना पास परवाना ओल्या काळ्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला असता ट्रॅक्टर चालक रवींद्र नामदेव राऊत, रा. काकडधरा, तळेगाव ट्रॅक्टर मालक नानकसिंग बावरी, रा-तळेगाव. ट्रॅक्टर चालक याने मालकाचे सांगण्यावरून भिष्णुर नदी पात्रातून रेतीची चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीच्या ताब्यातुन विना क्रमांकाचा नवीन ट्रॅक्टर किं.7,00,000/-रु. विना क्रमांकाची ट्रॉली कि.1,50,000/- रु. 01 ब्रास (100 फूट ) काळी रेती किंमत 5,000/-रु. साधा मोबाइल कि 1000/- रु. असा जु किं. 8,56,000/- रू चा मुद्देमाल जप्त करुन ट्रॅक्टर चालक व मालक यांचेविरुद्ध पोस्टे  तळेगाव अप क्र:-334/2023 कलम:- 379, 34 भा.दं.वि सहकलम 3(1)/181, 130/177 मोटार वाहन अधिनियम गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई – मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनी राम खोत, मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद कापसे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये