ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

आम आदमी पक्षाचे तहसीलदार राजेश भांडारकर यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     चार दिवसांपूर्वी तालुक्यात परतीचा पाऊस सतत पडत असल्याने तालुक्यातील वाघेडा, धामणी, सागरा, आगरा, खोकरी, बेलगाव, मासळ,पिरली, धानोली, मांगली आदी गाव शिवारातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही हे पीक धोक्यात आहे.

या नुकसानीमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे व तो आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून त्याचे त्वरित पंचनामे करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भद्रावती आम आदमी पक्षातर्फे येथील तहसील कार्यालयात राजेश भांडारकर तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना आम आदमी पक्षाचे सुरज शहा, सुमित हस्तक, सुरज खंगार, अमित कासारे, सतीश कुथे, प्रमोद टोंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये