ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस निरीक्षक सत्यजित आमले महासंचालक पदकने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरिक्षक व सध्या नाशिक ग्रामीण चे पोलीस निरिक्षक श्री सत्यजित आमले यांना महाराष्ट्र दिनी महासंचालक पदक ने सन्मानित करण्यात आले.

राज्य पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासंचालक पदक ने सन्मानित करण्यात येते.

पोलिस विभागात पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांची एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे, गडचांदूर येथे त्यांचे कार्य उल्लेखीय राहिले आहेत.

पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत त्यांचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला व इतरांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये