Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्हेर नवरगाव येथील बोगस डॉक्टरावर ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.  नंदू गुद्देवार

        ब्रह्मपुरी तालुक्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्हेर नवरगाव येथे उपचार करण्याचे कोणतेही डिग्री डिप्लोमा किंवा वैद्यकीय उपचार करण्याचे नोंदणीकृत प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांवर ब्रह्मपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची घटना आज घडली आहे.

        प्राप्त माहिती नुसार, अर्हेर नवरगाव येथील बाजार चौकात वास्तव्यास असलेले नाजूकराव रामकृष्ण खंडाईत वय 51 वर्ष असे बोगस डॉक्टरांचे नाव आहे. तर फिर्यादी ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दूधपचारे हे आहेत. बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्याबाबतचा आदेश फिर्यादी प्राप्त झाल्याने दि. ०३/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांनी तहसीलदार मासाळ, नायब तहसीलदार तालेवार, विस्तार अधिकारी मिलींदकुमार भागवत कुरसींगे, पं. स. ब्रम्हपुरी, पोहवा अरूण पिसे, मपाअं शिल्पा काटकर पोस्टे ब्रम्हपुरी, फॉर्मासीस्ट निहारीका रमेश नांदूरकर, डॉ. राहुल राजेश्वर सहारे वैदयकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र, अर्हेर नवरगांव यांचेसह सरकारी वाहनाने अर्हेर नवरगाव येथे गेले.

सोबत संदिप राजेश्व पिपरे वय ३६ वर्षे, आरोग्य सेवक, प्राआउपकेंद्र सोद्री, अशोक कुसन कोलते वय ४७ वर्षे, आरोग्य सेवक प्राआउपके. तोरगाव बु. यांना घेवुन अर्हेर नवरगाव येथिल बाजार चौकाचे जवळील नाजूकराव रामकृष्ण खंडाईत, रा. अर्हेर नवरगांव यांचे घरात गेलो असता त्याचे घरातील दुस-या खोलीत खुर्चीवर बसुन दुस-या इसमास स्टेथोस्कोप लावुन आरोग्याची तपासणी करीत असताना दिसुन आला._

     _तपासणी करणाऱ्या बोगस डॉक्टराला आम्ही येण्याचे कारण सांगुन आमचे अंगाची झडती घेण्याचे कळविले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर तपासणी करीत असलेल्या बोगस डॉक्टरांस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव नाजूकराव रामकृष्ण खंडाईत, वय ५१ वर्षे, व्यवसाय वैदयकीय, रा. अर्हेर नवरगांव असे सांगितले. त्याचे समोरील रुग्णाला नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव महादेव पंढरी हुमने वय ५१ वर्षे, रा. अर्हेर नवरगांव असे सांगितले. फिर्यादींनी त्याचे नावाची व गावाची खात्री केली व रूग्ण इसमास विचारपुस केली असता रूग्णाने सांगितले की, माझे दोन्ही पायाचे टोंगळे दुखत असून मला थरकाप आल्यासारखा वाटत आहे. म्हणून मी उपचारासाठी डॉ. खंडाईत यांचे दवाखान्यामध्ये आलो असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी डॉक्टरी उपचार करणा-या श्री नाजुकराव खंडाईत यांना वैदयकीय उपचार करण्याचे कोणती डीग्री, डिप्लोमा किंवा नोंदणीकृत प्रमाणपत्र असल्यास दाखवा असे विचारले असता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. सोबत अरेरावीची भाषा वापरत माझेकडे उपचारा करण्याचे कोणतेही डीग्री, डिप्लोमा किंवा नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्याचे सांगत तुम्हाला जे करायचं आहे ते करा असं सांगत होता. त्यांचे खुर्चीसमोर असलेल्या टेबलवर वापरलेले खाली सिरीज, इंजेक्शन, वापरलेले कॉटन असे साहित्य मिळून आले. तसेच दुस-या टेबलवर औषधी गोळ्या, इंजेक्शन, वैदयकीय उपकरणे दिसुन आले. तसेच रूग्ण तपासणीचे दोन बेड असल्याचे दिसुन आले.

बोगस डॉक्टर नाजुकराव खंडाईत यांना पंचासमक्ष सदर वैदयकीय साहीत्य व उपकरणे वापरण्याच्या किंवा वैदयकीय उपचार करण्याचा कोणताही नोंदणीकृत प्रमाणपत्र सादर केले नाही. सदर बोगस डॉक्टर नाजूकराव रामकृष्ण खंडाईत याच्यावर ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात फिर्यादी डॉ. विलास दुधपचारे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे._नमुद इसमावर यापुर्वी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क. १०४७/२०१८ कलम ३३,३३ (अ) महाराष्ट्र प्रॅक्टीशनरी अॅक्ट १९६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये