Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंनी केली स्कूलबस अपघातातील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर (ता.प्र) :- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी सकाळची शाळा आटोपून स्कूलबसने घरी परत येत असताना हरदोना येथे स्कूलबस पलटून अपघात झाला.

या बसमध्ये जवळपास ४० विद्यार्थी होते. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले ही बाब आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे प्रत्यक्ष भेटून जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व जखमी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

    यावेळी प्रा. आशिष देरकर, उमेश राजूरकर, विजय ठाकुरवार, सचिन भोयर, सागर ठाकुरवार, रुपेश चुधरी, सतीश बेतावर, मनोज भोजेकर, अभिषेक गोरे, मयुर एकरे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये