ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगवान येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा कवडु गाताडे यांचे निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

पंचायत समिती कोरपना अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगवान येथे शाळा व्यवस्थापन समिती नव्याने गठीत करण्यात आली परंतु दुसऱ्यांदा कवडु गाताडे यांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी पुजा नंदु कुडमेथे व सदस्य म्हणून पंचफुला बंडू तोडासे अनिता मांडवकर प्रभा मनोज कारेकर वंदना सुनील पेटकर विलास बावणे तर यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक कनाके सर सहाय्यक शिक्षक म्हणून राजेश कांबळे यावेळी उपस्थित होते व सर्व पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये