Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक गाव एक वाण सेंद्रिय शेती शाळा टांगारा या कोलाम गावात संपन्न     

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

     केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कल्याणकारी उपक्रम राबविल्या जात आहे अखेरच्या घटकापर्यंत याचा लाभ व्हावा या म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे शेतकऱ्यांना शेतीच्या कल्याणकारी व विकासाच्या योजनेचा लाभ व्हावा दर्जेदार उत्पादन घेऊन आर्थिक क्षमता वाढवावी रासायनिक व तीव्र विषारी कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा उत्पादित कापूस साठवणूक व मूल्यवर्धन साखळी निर्माण करून शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादनातून आर्थिक समृद्धी व्हावी शेतीमध्ये मजुरांची टंचाई यामुळे यांत्रिकी वापराचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची निर्माण झालेली गरजअधिक रासायनिक खत व तीव्र विषारी औषधी कीटकनाशक तन नाशक यांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे जल व मृत संधारण उपाय योजना जमिनीची सुपीकता सिंचनामध्ये ठिबक तुषार सिंचनकरण्याची आवश्यकता असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे.

केंद्र राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी श्री जी ठाकूर यांनी उपस्थित शेती शाळेच्या शेतकऱ्यांना दिली यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे सय्यद अली यांनी बदलते हवामान पीक पद्धती व प्रधानमंत्री जनमन योजनेतून जनजातीय कोलाम वसाहती मॉडेल म्हणून पुढे येण्यासाठीकोलाम समाजातील शिक्षकचीत युवकांनी पुढे येऊन गावात सामाजिक आर्थिक शैक्षणिक बदल घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले मंडळ अधिकारी एन राठोड यांनी शेती शाळेत उपस्थित शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी घ्यायची काळजी केंद्रीय शेती कमी खर्चाचे नैसर्गिक पालापाचोळा दसरपणी अर्क चा वापर यावर प्रत्यक्ष करून दाखवली एक गाव एक वान पिकाच्या दर्जेदार उत्पादन साठवणूक उच्च दर्जाचे कापूस गाठी तयार करण्यासाठी कापूस वेचणी साठवणूक विपणन व प्रक्रिया याबाबत ग्रेडर गोखले यांनी मार्गदर्शन केले प्रस्ताविक कृषी सहाय्यक राजू जाधव यांनी केले गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला शेतकरी यांना शासनाच्या योजनेची व्यापक माहिती देण्यात आली व योजना घेण्यामध्ये अडचणी असल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे ठाकूर तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले गावातील वसंत टेकाम बाळु टेकाम शंकर सिडाम भिमा आत्राम भिमबाई सिडाम अंबु आत्राम संगीता टेकाम यांचेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये