ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी आतिश कासारे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते अतिष कासारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी केली आहे
अतिश कासारे यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षाचे नेते रमेश कायंदे, यांना दिले आहे. अतिश यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.