ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाथरी येथील सचिवाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा – सरपंच – अनिता ठीकरे

आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी केली BDO कडे तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 सावली तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत ही ११ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या झंझावती विकास कामे पाहता अनेक अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीचे कौतुक केले परंतु सरपंच यांनी BDO कडे सचिवा विरुद्ध DSC (डिजिटल सिग्नेचर) मधून आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी तक्रार केले असल्याने पाथरी गावचा विकास विकसित होत असताना ग्रामपंचायत मधील काही पदाधिकाऱ्यांचे पोट सैल सुटल्याने आता मात्र भ्रष्टाचाराची कीड सुद्धा लागलेले दिसून येत आहे.

यामध्ये सरपंच यांना विश्वासात न घेता कोणतेही कामे न करता किंवा प्रलंबित असलेल्या कामाचे DSC (डिजिटल सिग्नेचर) मधुन सचिवानी पैसे काढले असल्याचे आरोप केले असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाले असल्याची तक्रार BDO कडे केली असल्याने BDO यांनी सरपंचांच्या तक्रारीवरून योग्य चौकशी करून दोषी आढळलेल्या पदाधिकाऱ्यावर योग्य कारवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याने आता या भ्रष्टाचाराचा पाण्यात पुन्हा कुणाकुणाचे पाय बुडालेले आहेत व किती व्यक्तीवर कारवाई होईल याकडे BDO च्या चौकशीअंती कळणार असल्याने किती भ्रष्टाचारी व कोणकोणत्या कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यात आला त्याकडे आता मात्र नागरिकांचेही लक्ष लागलेले दिसून येत आहे यामुळे याकडे BDO यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर भ्रष्टाचाराच्या छडा लावावा असे नागरिकात बोलले जात आहेत.

मला माहिती न देता सचिवानी कोणतेही कामे न करता DSC (डिजिटल सिग्नेचर) मधून आर्थिक व्यवहार केले असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचे आढळून आले असता यांची तक्रार BDO कडे केली आहे.

अनीता ठीकरे, सरपंच ग्रा. पं. पाथरी.

  सरपंच आणि सचिव हे ग्रामपंचायतील मुख्य सूत्रधार आहे जर सरपंचालाच माहिती न देता आर्थिक व्यवहार होत असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रवीण वाघमारे, सदस्य ग्रा.पं. पाथरी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये