ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 11मार्च 2024 पासून दलित पॅंथरचे आमरण उपोषण आंदोलन सुरू

केंद्र शासन,राज्य सरकारने मागण्या त्वरित निकाली न काढल्यास दलित पॅंथरचे आंदोलन अधिक उग्र करू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खडसे यांचा इशारा

आझाद मैदान मुंबई येथे दलित पॅंथरचे दिनांक 11 मार्च 2024 पासून दादर रेल्वे स्थानकाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी तसेच दलित शोषित मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या अडगळीत पडलेल्या समस्या सोडविण्यासाठी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खडसे यांच्या प्रमुख नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली बेमुदत आमरण उपोषण आंदोलन धरणे आणि निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

सदर आंदोलनामध्ये दलित पॅंथर चे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुरेश दादा सोनवणे दलित पॅंथरच्या मुंबई विभाग महासचिव स्वप्नालीताई सोनवणे, दलित पॅंथरच्या केंद्रीय सदस्य तथा विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक तारा ऱेवस्कर, दलित पँथर चे रायगड जिल्हा अध्यक्ष बालाजी पात्रे,दलित पँथर चे विदर्भ प्रदेश संघटक सर्फुद्दीन पठाण साहब, दलित पॅंथरचे तालुका कर्जत अध्यक्ष प्रकाश कनोजे, दलित पॅंथर चे अमरावती शहराध्यक्ष इंगोले आदींच्या प्रमुख नेतृत्वामध्ये सदर आंदोलन सुरू करण्यात आलेली आहे. दलित पॅंथरच्या या आंदोलनामध्ये मुंबई विभाग रायगड तसेच अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पँथर कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. केंद्र सरकारने तसेच,महाराष्ट्र शासनाने दलित पॅंथरच्या मागण्या त्वरित निकाली काढाव्यात अशी मागणी दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खडसे यांनी केलेली आहे.

 दलित,मागासवर्गीय आदिवासी तसेच अनुसूचित जातीच्या लोकांच्या समस्या सरकारने त्वरित निकाली न काढल्यास दलित पँथर च्या वतीने आंदोलन अधिक उग्र केल्या जाईल असा इशारा दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खडसे यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये